प्रायोगिक तत्वावर १२० घरांचे सर्व्हे, आठ दिवसात सुरु होणार मुख्य सव्हर्ेे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- नगर परिषद क्षेत्र अंतर्गत च्या एकूण १६,४०० घरांचे सर्वे करायचे निर्देश देताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी नगर परिषदेने प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्र. दोन ते पाच सह १५ आणि १६ क्रमांकाच्या प्रभागाचे १२० घरांचा ड्रोन द्वारे सर्वे केला. या वेळी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून सर्वेचा आढावा घेतला. प्रायोगिक तत्वावर झालेल्या या सर्वे नंतर पुढील आठवड्यात शहरातील अन्य भागाच्या मुख्य सर्वेची सुरुवात करणार असल्याचे या वेळी न. प. च्या मुख्याधिकारी कारण कुमार यांनी सांगितले. तब्बल ११२ वर्ष लोटली तरीही भंडारा शहराचा सर्वे चा प्रश्न रेंगळताच होता. आ. नरेंद्रभोंडेकर यांनी या विषयावर चर्चा केली. हे काम फक्त तीन कोटी ४० लक्ष रूपयाच्या निधी करीत रडखडलेले आहे. ज्यावर त्यांनी नगर परिषदेला एक कोटी रुपये भरून सर्वे सुरु करण्याचे निर्देश दिले.

या निर्देशवर नगर परिषदेने तत्काल प्रस्ताव सादर करून निधीला मंजूरी दिली आणि कामास सुरवात केली. या अंतर्गत रविवारी नगर परिषदेने प्रायोगिक तत्वावर शहरातील प्रभाग क्र. दोन ते पाच आणि १५ व १६ या प्रभागांचा सर्वे करून १२० घरांची नोंद केली. गेल्या अनेक वर्ष पासून रेंगाळलेल्या सर्वे च्या प्रश्नाला मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या करीत आ. भोंडेकर यांचे आभार मानले जात आहे. उल्लेखनीय आहे कि भंडारानगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत १९१२ साली सर्वे करण्यात आला होता. इंग्रज काळात झालेल्या सर्वे नंतर या क्षेत्राचे सर्वे न झाल्या मुळे नगर परिषद क्षेत्रांतर्गत १६४०० परिवार नगर परिषदेच्या हद्दी बाहेरच आहेत. ज्या मुळे आजही वरील सर्व निवासी हे अतिक्रमण धारक म्हणविले जात आहे. अश्यात आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे हा विषय गांभीर्याने हाताळून सर्वे सुरू करण्याचे निर्देश दिल्या गेले होते. यात भंडारा नगर परिषद हद्देतील पिंगलाई येथील ३२००, गणेशपूर चे ५०००, केसलवाडा चे १२०० व भंडारा खास येथील ७००० असे एकूण १६४०० घरांचे सिटी सर्वे करावयाचे आहे. आम. भोंडेकर यांच्या निर्देश नंतर शहरात सिटी सर्वे ल सुरुवात झाली असून लवकरच हा सर्वे पूर्ण होऊन १६४०० परिवारांना हक्काचे घर मुळे शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *