बेला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. गावस्तरावर ” “हे अभियान यशस्वी व्हावे या करिता जिल्हा परिषद भंडारा व ग्रामपंचायत बेला यांच्या संयुक्त विद्यमानने जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले.

या अभियानाचे शुभारंभ जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, नागपूरचे सहाय्यक आयुक्त मंजुषा ठावकर, अभियान जिल्हा पालक अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदगवळी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पं. स. सदस्य सौ रत्नमाला चेतुले, परीक्षाधीन गट विकासअधिकारी पीयुष डोंगरे, परिविक्षाधीन सहा. गट विकास अधिकारी, शिवशंकर इंगोले, उमेदचे तिडके, ग्राम महसूल अधिकारी राजेश ठाकरे, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, अधीक्षक अजय बदोरिया, नामदेव भुरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमात असंख्य विद्यार्थी यांचा समावेश होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे, सदयसगण सर्वश्री धनराज गाढवे,विनोद नागपुरे, अर्चना पंचबुद्धे, रजनीताई बाभरे, बबिता चवरे, सुप्रिया शेंडे, मनीषा इंगळे, वंदना कुथे, राकेश मते, श्रीकृष्ण वैद्य, स्नेहल मेश्राम,सोपान अजबले, पोलीस पाटील, भिवंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष रामलाल सर्वे, व विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक मिनाक्षी खोब्रागडे तर आभार उमेश नंदागवळी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *