तुमसर तालुक्यात मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राजअभियान यशस्वीरित्या राबवावे

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीरित्या राबविण्यात यावे असे आवाहन पंचायत समिती तुमसरचे उपसभापती सुभाष बोरकर यांनी १६ सप्टेंबर रोजी पंचायत समिती तुमसरच्या सभाहाल मध्ये घेण्यात आलेल्या संपर्क अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सभेत बोलतानी केले. सदर अभियान हा १७ सप्टेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी पंचायत समिती स्तरावरील दोन संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. त्या संपर्क अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन मार्गदर्शन करावे व सदर अभियान यशस्वीरित्या कसे पार पाडता येईल यासाठी अथक परिश्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यात यावेअसे आव्हानही उपसभापती बोरकर यांनी केले आहे.

पंचायतराज अभियान समाप्ती नंतर या अभियानाची राज्यस्तरावर तपासणी होणार असून तालुक्याची तपासणी जिल्हास्तरावर, जिल्ह्याची तपासणी विभागीय स्तरावर, विभागाची तपासणी राज्यस्तरावर तर राज्याची तपासणी राज्यस्तरीय समिती करणार असल्याची माहिती पंचायत समिती तुमसरचे विस्तार अधिकारी उत्तम पाठे यांनी दिली आहे. काल पंचायत समिती तुमसर येथे झालेल्या संपर्क अधिकाऱ्यांच्या बैठकीत पंचायत समिती तुमसरचे उप सभापती सुभाष बोरकर, गटविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष सानप, विस्तार अधिकारी राजीव महंत, विस्तार अधिकारी उत्तम पाठे, विस्तार अधिकारी सुधाकर चिंधालोरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत माडगी येथून करण्यात आली असून तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार १५ लाख, द्वितीय पुरस्कार १२ लाख व तृतीय पुरस्कार ८ लाख असून ५ – ५ लाख रुपये विशेष पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *