आपले परिसर व शहर स्वच्छ ठेवा – मुख्याधिकारी वासेकर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा अभियान नगरपरिषद हद्दीमध्ये सुरू करण्यात आला असून कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी प्रत्येक नागरिकांनी या पंधरवड्यात आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यास नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन केले.आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती तसेच स्वच्छता चे दूत, समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छता ही सेवा अभियान २०२५ या अभियान पंधरवडा ला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर प्रमुख अतिथी नगरपरिषद साकोली चे स्वच्छता दूत महाराष्ट्र शासन पुरस्कृत क्रीडा संघटक शाहेद कुरेशी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सिंग बैस, प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर, पाणीपुरवठा अभियंतासंतोष दोनतूलवार, कल्याणी भवरे, नितीन मेश्राम, विवेक मेश्राम, लेखापाल टेंभुरकर, शहर समन्वयक अभियंता मिलन गजापुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रबोधनकार ठाकरे व स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता हीच सेवा ची शपथ घेतली. यामध्ये न. प. कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *