थकीत शिष्यवृत्ती तत्काळ जमा करावी तहसीलदार कार्यालयात विद्यार्थ्यांचे निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ जमा करण्यात यावी व शिष्यवृत्तीतील अनुदान वाढविण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज तहसीलदार कार्यालय, लाखनी येथे विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले. मागील काही वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून पालकांनाही मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून थकीत शिष्यवृत्ती वितरित करावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. निवेदन सादर करताना युवक अध्यक्ष अमोल गुरगे, विद्यार्थी अध्यक्ष टोनल भिवगडे, सामाजिक कार्यकर्ता व पालक जितु शामकुवर, ज्येष्ठ विद्यार्थी अमन हटवार उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक तहसीलदार कार्यालयात दाखल झाले होते.







