ओबीसी आरक्षणातील घुसखोरी खपवून घेणार नाही

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी:- ओबीसी समाजाच्या आरक्षणात होणाऱ्या कथित “बोगस’ घुसखोरीच्या विरोधात ओबीसी समाजाने भूमिका घेतली आहे. हैदराबाद गॅझेटिअरबाबत सरकारने काढलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करत ओबीसी बांधवांनी आज तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना ओबीसी समाजावर कसा अन्याय होतो याबाबतचे निवेदन सादर केले. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.

शासनाने शासन निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा ओबीसी बांधवांवर अन्याय आहे. हा अन्याय कदापीही खपवून घेणार नाही. असा इशारा देत मोहाडी तालुक्यातील कुणबी समाज संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडकले. शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हूनअधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *