सततच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सततच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी झालेली आहे. आजच्या घडीला शेतकरी संकटात सापडलेला आहे. तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती तुमसरचे माजी उप सभापती हिरालाल नागपुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे. सततच्या नापिकीमुळे आधीच शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा थेट गावाकडे वळिवला आहे. शेतकऱ्यात रानटी डुकरांची चांगलीच भीती संचारली आहे. शेतकऱ्यावर केव्हा हमला होईल सांगणे कठीण झाले आहे. जंगली प्राण्यांच्या वाढत्या प्रकोपामुळे तुमसर, सिहोरा व बपेरा परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. या जंगली प्राण्यांनी सुद्धा धान पिकावर आपला हल्ला चढविला आहे.
निसर्गाचा लहरीपणा व वाढत्या महागाईमुळे आधीच शेतकरी दारिद्री नारायणाचा अवतार म्हणून जगत आहे. सततच्या पावसाने हलक्या धानाची माती होऊन जमिनीत लोडला आहे. पावसाची अशीच स्थिती असली तर भारी धानाला सुद्धा धोका आहे. सततच्या पावसाने गादमासी, खोडकिडा, मावा, तुडतुडा व पाणे गुंडाळणाऱ्या अळीचा सुद्धा प्रकोप दिवसें दिवस वाढत चालला आहे. काही शेतकऱ्यांची धानाचे पीक मागील पुरात वाहून गेले आहे. तो शेतकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे. औषधी व खताच्या वाढत्या किमती आणी नागरटी व मजुरांचा खर्च याची जुळवा जुळवी केल्यास शेतकऱ्यांची स्थिती फारच बिकट झाली आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच झोडपले आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती हिरालाल नागपूरे यांनी







