नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे यांच्या उपस्थितीत पालोरा येथे लक्ष्मी मुक्ती शिबिर
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा:- सेवा पंधरवाडा अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय पालोरा येथे १६ सप्टेंबर २०२५ रोजी लक्ष्मी मुक्ती योजने बाबत समाधान शिबिराचे आयोजन नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले.
यावेळी मंडळ अधिकारी संगीता हलमारे, पालोराचे सरपंच शिल्पा तुमसरे, पं. स. सदस्य प्रिती शेंडे, पंं. स. सदस्य आशा बोंद्रे, जांभोराचे उपसरपंच यादोराव मुंगमोडे, माजी सरपंच भुपेद्र पवनकर, ग्रा. प.ं सदस्य मेघा कुंभलकर, प्रमिला भोयर, किशोर अतकारी, तलाठी वसंताकांबळे, होमशंकर कटरे, ग्रामसेवक एस. एस. शेळके, नितीन राठोड, उमेश तुमसरे, सुधाकर बावणे, देवदास बुरडे, श्रीधर ठाकरे, प्रमोद गहाणे, पोलीस पाटील राजु बोंद्रे, व इतर गावकरी परीसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री सबलीकरण करण्याकरिता शासनाच्या लक्ष्मी मृक्ती योजनेबाबत नायब तहसीलदार कारेमोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पात्र असलेल्या लाभार्थी कडून अर्ज स्विकारण्यात आले. उपस्थितांनी जास्तीत जास्त लोकांना स्त्रीयांचे हक्क सुरक्षित रहावे या दृष्टीने शासनाच्या या उपक्रमाबाबत माहिती द्यावी आणि इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज तलाठी कार्यालयात सादर करावे असे यावेळी मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांनी सांगितले.







