गोंदिया ते इंदोर-बंगलोर विमान सेवेचा शुभारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेल प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्नांतून विकसित झालेल्या बिरसी विमानतळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा व नियमीत हवाई सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने खा.प्रफुल पटेल यांनी इंडिगो विमान सेवा च्या माध्यमातून नियमित गोंदिया ते हैदराबाद सुरू करण्यात आली. याच श्रुखलेत गोंदिया (बिरसी) विमानतळ येथे आज दिनांक १६ सप्टेंबर पासून श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून गोंदिया ते इंदोर – बंगलोर स्टार एअरलाइन्स विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. गोंदिया (बिरसी) विमानतळावरून स्टार एअरलाईन्सची विमान सेवा आजपासून मंगळवार, बुधवार वशुक्रवार अशी तीन दिवस बिरसी – इंदोर व बंगलोर अशी राहणार आहे.

इंदोर वरून सायंकाळी ५.०० उड्डाण भरून गोंदिया येथे ५.५५ पोहचणार तसेच गोंदिया (बिरसी) विमान तळावरून ६.२५ वाजता इंदोर करीता व इंदोर वरून बंगलोर करीता ०७.५० वाजता उड्डाण भरणार आहे. या विमान सेवेमुळे गोंदिया – मध्यप्रदेश, छत्तीसगड व परिसरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थ्यांना लाभ होवूनव्यापाराला चालना मिळणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने भविष्यात गोंदिया (बिरसी) येथून लवकरच मुंबई, पुणे व दिल्ली करीता नियमित विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे असे शुभारंभ प्रसंगी बोलतांना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सांगितले. शुभारंभ सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन, स्टार एअर चे गिरीशचंद्र वर्मा, पंकज कांबळे, प्रमोद सोनी और किरण सावळे, दीपक कुमार, सुनील साबळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *