कॉपर बंडल चोरी करतांना ९ आरोपींना रंगेहात पकडले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातून चोरून आणलेला कॉपर केबल स्कार्पिओ गाडीतून तुमसर तालुक्यातील मिर्झापूर हमेशा झुडपी जंगलात लपवून ठेवला. नंतर त्यांचे केबल वायर काढत असताना गोबरवाही पोलिसांनी ९ आरोपींना रंगेहात पकडले. एक फरार झाला. त्यांच्या ताब्यातून एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभम ताराचंद परबते (२४) रा. चिखला, रिहान सुरेश मेश्राम वय २४ वर्षे रा. शंकर पिरपरीया ता. खैरलांजी जि. बालाघाट, विक्रांत गजानन झोडे वय २२ वर्षे रा. बोनकट्टा, शुभम गोसावी टेकाम वय २५ वर्षे रा. चिखला, गंगा सेवकराम शेंबरे वय २० वर्षे रा. चिखला, दद्या उर्फ भाग्यवान सुकराम गहाने वय२२ वर्षे रा. चिखला, सुमीत विजय कंगाली वय १९ वर्षे रा. चिखला, अजय दिलीप देरकर वय २२ वर्षे रा. बोनकट्टा म.प्र., उमेश काळसर्पे वय अं. २३ वर्षे रा. हिरापुर व फरार आरोपी समीर शेख वय अं. २६ वर्षे रा. चिखला असे आरोपींचे नाव आहे.

गोबर नाही पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फिर्यादी गिते हे पोलीस स्टॉफसह पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करीत होते. तेव्हा आरोपी मौजा पाथरी ते कवलेवाडा रोडचे बाजुला झुडपी जंगलात बसुन काळया रंगाचा केबल वायर काटतांना दिसुन आले. आरोपीतांना ताब्यात घेवुनविचारपुस केली असता आरोपीतांनी संगणमत करून भरवेली माईल बालाघाट म.प्र येथुन माईल परिसरात ठेवलेला काळ्या रंगाचा केबल चोरी करून चोरी केलेला माल स्कार्पीओ गाडीत भरून मौजा हिरापुर हमेशा झुडपी जंगलामध्ये घेवुन आले.

चोरी केलेला केबलचा वरील प्लास्टीक कव्हर काढतांना मिळुन आले. आरोपीच्या ताब्यातुन घटनास्थळी तांब्याचे बंडल अंदाजे १०० किलो प्रती ८०० रु किलो प्रमाणे एकुण कि. ८० हजार रुपये, घटनास्थळाचे बाजुला एक काळया, सिल्वर रंगाची हिरो आय स्मार्ट मो.सा. क्र. एम एच ३१टि. ०५१७ अ. ६०,००० रु. तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेली एक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ गाडी एम एच ३६ एच ०९९९ अ.कि. ६,००,००० रु. असा एकुण कि. ७,४०,००० रु. चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ०१ ते १० विरुध्द पोलीस स्टेशन गोबरवाही येथे कलम ३०५ (ए), ३२९, ३(५) भा. न्या. संहिता २०२३, नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा., पो.नि. शेवाळे सा. यांच्या मार्गदर्शनात पोउपनि. गिते, पोहवा. कडव, पोहवा, खोब्रागडे, पोस्टे. गोबरवाही, यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन गोबरवाही, चे अधिकारी करीत आहेत.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *