अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला चार दिवसात दुसरी कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा:- खडकी कडून भंडारा कडे अवैद्य रेती भरून जाणारा ट्रक पालोरा महसूल मंडळ कर्मचारी ने पाठलाग करून ढिवरवाडा येथे पकडून मोहाडी तहसील ला जमा करून धडक कार्यवाही केली. अवघ्या चार दिवसात २ री कार्यवाही झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीवरून तिरोडा तालुक्यातील अजर्ुनी रेती घाटातून अवैद्य रित्या एम.एच. ४०/बि.एल. ३०२४ क्रमांकचा ट्रक खडकी मार्गे भंडारा नागपूर कडे जात होता. याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी संगीता हलमारे, तलाठी कटरे, प्रिया ठवकर, महसूल सेवक अनिल वैद्य, बादल तिरपूडे, मुलचंद उरकुडे, हे त्या ट्रक च्या मागे पाठलाग करीत असताना ट्रक चालकाने कारवाईच्या भीती पोटी ट्रक ढिवरवाडा गावात टाकला अन इथेच त्याचे बारा वाजले.

ट्रक गावात पळाला आणि गावातील चौकात जाऊन फसल्याने महसूल विभागाच्या जाळ्यात फसला. या संबंधीची माहिती तहसीलदार मोहाडी यांना देण्यात आली. नायब तहसीलदार विमल थोटे, मंडळ अधिकारी इप्पर, कुंभारे, चालक कृष्णा भोयर, तलाठी विकास कदम वेळीच दाखल झाले. अन ट्रक ताब्यात घेऊन ट्रक मोहाडी तहसीलला जमा करण्यात आला सदर ट्रक मौदा येथील असल्याचे बोलले जाते. चार दिवसात दुसरी कारवाई केली असून या अगोदर डोंगरदेव जवळ ट्रक पकडून तहसीलला जमा केला. आज पुन्हा. त्यामुळं रेती चोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *