अड्याळ पोलिसांची अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अड्याळ पोलिसांनी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करून चार ट्रक्टरसह ३४ लाख १ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. धरमविर लहुजी खोब्रागडे वय ३८ वर्ष, सुरबिर लहूजी खोब्रागडे वय ३८ वर्ष रा. चिचाळ ता. पवनी, वैभव राजीराम नखाते वय २२ वर्ष रा. चिचाळ ता. पवनी, विक्री अरविंद टेकाम वय २८ वर्ष रा. चिचाळ असे आरोपीचे नाव आहे.
यातील फिर्यादी यांनी सोबत असलेल्या स्टॉपसह मौजा चिचाळ स्मशानभुमी हायवे पेट्रोलींग करीत असता यातील नमुद आरोपीतांनी त्याचेकडे कोणत्याही प्रकारचे उत्खनना बाबत रॉयल्टी / परवाना नसतांना सुध्दा ०१) पिवळ्या रंगाचे जेसिबी क्रमांक एम.एच.४० वी.जे.७६६२ किंमती अंदाजे १६,००,०००/- रु क्र.०२) सोनालिका कंपनीचा विनानंबरचा ट्रॅक्टर व ट्राली किंमती अंदाजे ७,००,०००/- रु त्यामध्ये एक ब्रास मुरुम (गौनखनीज) किंमती १५०० /- र क्र.०३) हिरव्या रंगाचा जॉनडीअर कंपनीचा ट्रैक्टर क.एम.एच.४० एल ९५७९ त्याला विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली किंमती ५,००,०००/- रु क्र.०४) हिरव्या रंगाचा जॉनदीजर कंपनीचा विनाक्रमाकाचा ट्रॅक्टर व ट्राली किंमती अंदाजे ६,००,०००/रु असा एकुण ३४,०१,५००/ – रु चा मुद्देमाल अवैध्यरित्या मुरुम (गौनखनीज) चे उत्खनन करतांनी मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरुन अप क. २५३/२०२५ काम ३०३(२),३ (५) भान्यास सहकलम ४८ (८) जमीन महसुल अधिनीयम, सहकलम ७.९ पर्यावरण संरक्षण अधिनीयम, सहकलम ५०/१७७ मो.वा.का. नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन सा. मा. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा. सपोनि पाटील सा. यांच्या मार्गदर्शनात पो. हवा. रविंद्र आंबुडारे, पोलीस स्टेशन अड्याळ, यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अड्याळ चे अधिकारी करीत आहेत.







