महाविकास आघाडी तर्फे “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्याची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज महाआघाडीच्या वतीने विश्रामगृह हे त्रिमूर्ती चौक पर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रस्तावित विधेयक हे लोकशाही विरोधी असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कार्यकर्ते, पत्रकार आणि विरोधी विचार व्यक्त करणाऱ्या नागरिकांवर अवाजवी पोलीस नियंत्रण व कारवाई होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली.
यामुळे राज्यात लोकशाही मूल्यांची पायमल्ली होऊन पोलिसी राजवट निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करून नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे रक्षण करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी मोहन पंचभाई जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा कॉंग्रेस, चरण वाघमारे जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, संजय रेहपाडे जिल्हा प्रमुख शिवसेना, हिवराज उके कम्युनिष्ट पार्टी जिल्हा सचिव, सदानंद इलमे ओबीसी चळवळ, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, प्रदेश महासचिव जिया पटेल, अनिता भुरे, स्वाती वाघाये, नीलिमा रामटेके, शीतल राऊत, पूजा हजारे, मधुकर चौधरी, धनराज साठवणे, पवन वंजारी, प्यारेलाल वाघमारे, शाहीना खान, लता बावनकुळे, निशा सोनकुसरे, सुनंदा घनजोडे, दिलीप मसुरकर, रिजवान काजी, मयूर जोशी, अरविंद पडोळे, योगेश झळके, रिजवान काझी, अजय मेश्राम, नितेश मारवाडे, नरेंद्र साकुरे, पवन मस्के, अभिजित वंजारी, जितेश धोम्बरे, प्रमोद मानापुरे, प्रकाश पचारे, मधुकर भोपे, प्रशांत वैद्य, कमलाकर श्याम्पुरकर, प्रेम वणवे, देवा इलमे, भाऊ कातोरे, राजेश हटवार, तुळसीदास बिलवने, गोविंद हुकरे, जितेंद्र रहपाडे, विपीन बोरकर,भगवान नवघरे, पृथ्वी तांडेकर, शाम्मू शेख, जय डोंगरे, सुभाष आजबाले, बाळू ठवकर, सुरेश मेश्राम, अमित खोब्रागडे, बाळाभस्मे, श्रीकांत बन्सोड, चंद्रशेखर भिवगडे, मुनिस्वार बोदलकर, प्रीतम भोन्डेकर, किशोर राऊत, रोहित गाडवे, योगेश शेंडे, योगेश गायधने, नदीम शेख, इम्रान पटेल, प्रकाश गभने, अनिरुध गाढवे, अतुल मिरासे व अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.







