विविध मागण्यासाठी साकोलीत ओबीसींच्या मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ओबीसी समाजाचे मुख्य समन्वयक जनगणना परिषदचे सदानंद इलमे, बाळकृष्ण सावे, जयंत झोडे, भगीरथ धोटे, अरुण लुटे, ललिता देशमुख, मंगला वाडीभस्मे, मनीष कापगते, अमोल हलमारे, वंचित महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी. जी. रंगारी, रोशन उरकूडे, रमेश शहारे, आदिनाथ गेडाम इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रैली संपन्न झाली. सर्वप्रथम साकोली येथील लहरी बाबा चे मठ या ठिकाणी सर्व लोक गोळा होऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा काय राहील रॅली कोणत्या बाजूला कुठे निघाली याविषयी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर रॅलीची सुरुवात लहरी बाबाचे मठ, एकोडीरोड, बस स्टॉप असं करता तहसील येथे गेली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मागण्या खालील प्रमाणे होत्या.
जातीनिहाय जनगणना शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करावी जेणेकरून प्रत्येक समाजाची लोकसंख्या आणि त्याची सामाजिक आर्थिक स्थिती स्पष्ट होईल, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवून लोकसंख्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे, आरक्षण संरक्षण शासनाने मराठा आंदोलकाच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये समाजाचे आरक्षण रक्षण करावे आणि २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आर शासनाने रद्द करावा. या ठिकाणी तहसील ऑफिस येथे सर्वांचे मार्गदर्शन घेण्यात आले त्यामध्ये सदानंद इलमे, मनीष कापगते, राधेश्याम मंगमोडे, जयंत झोडे, बाळकृष्ण सारवे, मंगला वाडीभस्मे, मनीष कापगते यांचे भाषण झाले. त्यानंतर २ सप्टेंबर चा जीआर ची सर्वसमक्ष होळी करण्यात आली मध्ये ज्ञानेश्वर बाहेकर, अभिमन्यू चूटे, खेमचंद कावडे, पूजा देशमुख, कार्तिक मेश्राम, ईश्वर कटणकर, युद्धेश कुमार भेंडारकर, शितल नागदेवे, सुधीर भांडारकर, वीरेंद्र भंडारकर, गीता बोरकर, कुंदा मंगलमारे, सचिन खोटेले व इतरही भरपूर मोठ्या संख्येने महिला, पुरुष रॅलीमध्ये ओबीसी बांधव सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.







