भंडारा जिल्ह्यात विविध समविचारी संघटनांची एकच ओबीसी संघर्ष समिती गठीत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सुवर्णकार महासंघ, नामदेव शिम्पी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, युथ फॉर सोसल जस्टिस, एकलव्य सेना, महात्मा फुले मित्र मन्डळ, कोहळी महासंघ अशा सुमारे दहा संघटना एकत्र येत ओबीसी संघर्ष समिती गठीत करण्यात आली. याद्वारे रस्त्यावरील तथा न्यायालयिन मार्गाने आंदोलन सुरू केले जाईल.

गावागावात जाऊन ओबीसी विरोधी शक्तींचा सक्षमपणे विरोध केला जाईल. ही लढाई जनसामान्यांना आपली वाटेल. जे जन प्रतिनिधी ओबीसी विरोधी भूमिका घेऊन केवळ मराठाधार्जिने वक्तव्ये करत समाजाची दिशाभूल करतात त्यांचे पितळ उघडे पाडले जातील. ओबीसी समर्थकांचे स्वागत केले जाईल असे समितीच्या सभेत जमलेले सदस्य बोलत होते. समितीचे मुख्य संयोजक डॉ. बाळकृष्ण सार्वे, सदानंद ईलमे, प्रभाकर वैरागडे, रोशन उरकुडे, सुभाष उके, राजकुमार लांजेवार, श्रीकांत म्हस्के, स्वप्नील दाभाडेप्रदीप गेधे, केशव हूड, अरुण भेदे, संजय बनकर, योगेश शेंडे, सुधाकर मोथलकर, सेवक हातझाडे, विजय वाणी, कार्तिक स्वामी मेश्राम, यांची ओबीसी संघर्ष समितीचे समन्वयक म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

यात सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्यात आले. या सभेला ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम यांची उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ओबीसी आंदोलन मोठं करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेटाने व एकजुटीने काम करण्याचे आवाहन डॉ. बाळकृष्ण सार्वे यांनी केले. प्रमुख वक्त्यासह अरुण भेदे, प्रभाकर वैरागडे, सदानंद ईलमे, कार्तिक मेश्राम यांचेही मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी केले.

सभेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव गोंधुळे, माधवराव भोयर, वामनराव वझाळे, भगीरथ धोटे, के. झेड शेंडे, मनोहर बारस्कर से. नि. शिक्षणाधिकारी यांच्या सह, केशव शेंडे, नरेश बेंदेवार, संजय आजबले, पुरुषोत्तम समरित, प्रकाश मुटकुरे, विनायक बांते, ग्यानचंद जांभुळकर, देव झलके, डॉ. मुकेश पुडके, आत्माराम बेदरकार, अनिल शेंडे, ईश्वर निकुळे, संजीव बोरकर, नेपाल चिचमलकर, राजेश आजबले, उमेश सिंगनजुळे, डी. एम. अतकरी, डी. एन. सेलोकर, पंजाब कारेमोरे, दिनकर काटेखाये, पियुष आकरे, अरुण गावंडे, गजानन पाचे, ताराचंद देशमुख, अरुण लुटे, पांडुरंग खाटिक, सुरेश वैरागडे, गोपाल देशमुख, अजाबराव चिचामे, सुभाष पाल, लक्ष्मण ईश्वरकर, श. ना. मनगटे, विलास नागोराव, गुणवंत पंचबुध्दे, नाना राघोर्ते, विपीन वातकर, स्वप्निल वाभाडे, मंगेश शेंडे, डॉ.अविनाश नान्हे, विष्णू जगनाडे, ज्योत्स्ना गायधने, गायत्री पाथोळे, प्रमिला डोरले, मंगला वाडिभस्मे, अनिता बोरकर, ललिता देशमुख, लता बोरकर, जयश्री जगनाडे, शामली उरकुडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *