केसलवाडा पांदन रस्त्याचे काम न करता बोगस मजूर लावून पैसेची उचल

दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा :- मोहाडी तालुक्यात पांदण रस्त्याच्या बोगस कामाचे एकामागे एक प्रकरण चव्हाट्यावर येत आहेत. केसलवाडा (जंगल) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आंबे तलाव ते बेहळे तलाव व बेहाळे तलाव ते शारदा साठवणे यांच्या शेतापर्यंत पांदन खडीकरण रस्त्याचे काम दाखवून बोगस मजुरी लावून दोन्ही कामाचे १५ लाख रुपये काढून सरपंच, ग्रामसेवक व तांत्रिक अभियंता यांनी हळप केल्याची तक्रार जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांच्याकडे केली आहे. केसलवाडा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत २ पांदन रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. यात (१) आंबे तलाव ते भेहळे तलाव, (२) बेहाळे तलाव ते शारदा साठवणे पर्यंत पादन रस्त्याचे काम यांचा समावेश आहे. हे काम करणे होते. परंतु सदर पांदन रस्त्याचे काम न करता पांदन रस्त्यावर मुरूम व गिट्टी घातल्याचे दाखवुन तांत्रिक अभियंता, ग्रामपंचायतचे सचिव, पदाधिकारी व रोजगार सेवकांच्या संगनमतने प्रती पांदन १५ लक्ष प्रमाणे ३० लक्ष रू. उचल केल्याचे तक्रारीतुन म्हटले आहे.

काही कामावर माती काम करण्यात आले तर काही कामावर मुरूम टाकून मजुरांच्या नावे पैसे काढण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत कडून लूट करण्याचा आरोप तक्रारीतुन केला आहे. पांदन खडीकरण रस्ते हे जेसिबीच्या सहाय्याने करण्यात आले असून अकुशल कामाचा मोबदलागावातील नागरीकांच्या नावाने काढण्यात आला. जे कामावर गेले नाही अशा व्यक्तीच्या नावे पैसे काढण्यात आले व त्यांचे घरोघरी जावून पैसे परत मागण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतुन ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र शेंद्रे, ग्रा. पं. सदस्य सुशिल कोहळे, मच्छिंद्र नेवारे, नितेश नेवारे, ईश्वर गजभिये, विश्वनाथ कोहळे, गणेश नेवारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पांदन रस्त्याचे काम न करता पैसेची उचल केली असून रोजगार सेवक अरविंद साठवणे यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पैसे जमा केले असल्याचे म्हटले आहे तरी वरीष्ठ अधिकारी यांनी मौका चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *