लाखनी येथे जुगार अड्डयावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सिंधी कॉलनी, बाजार वॉर्ड लाखनी येथे सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड घालून २ लाख ७० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींचे नाव मयुर दुधराम सोनवाने (वय २१, रा. गणेश वार्ड साकोली), अभिजीत दिलीप बडोले (वय ३५, रा. वार्ड क्र. १७ लाखनी), ओम खुशाल गायधनी (वय १९, रा. वार्ड क्र. ६ लाखनी), पाहिजे आरोपी सुमित प्रकाश अत्तीरकर (वय ४८, रा. सहकार नगर वार्ड क्र. २ चंद्रपुर) असे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिंधी कॉलनी, बाजार वार्ड लाखनी येथे ही कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून १२ वेगवेगळ्या कपन्यांच्या ईलेक्ट्रानिक डिजीटल गेंमीग मशिन प्रत्येकी २० हजार रुपये एकूण २ लाख ४० हजार रुपये, २ मोबाईल, आरोपींच्या अंगझडतीमध्ये मिळालेले पैसे असा एकूण २ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *