लाखनी तालुक्यात पालकमंत्री दरबारात जनतेने घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी ः- भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनातून दर सोमवारी जनता दरबार करण्याचे आदेश दिले. याची सुरुवात (ता.८ सप्टेंबर) रोज सोमवारला तहसील लाखनी येथून सुरुवात झाल्याने जनता दरबाराचे आयोजन तहसीलदार लाखनी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यात सात तक्रारी प्राप्त झाल्या. सदर दरबारात विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी तसेच बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांना तहसीलदार लाखनी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यांनुसार त्यांचेकडून अर्ज प्राप्त करुन घेतले. व जलद गतीने निकाली काढण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.हा जनता दरबार थेट अधिकारी ते नागरिक यांच्यात होत असल्याने यामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मांडता आल्या आणि अनेक प्रकरणे त्वरित निकाली काढल्या जात असल्याने नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सूचनेनुसार दर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून तहसील कार्यालयात विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज थेट स्वीकारतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. शुक्रवारपर्यंत अर्जाची खात्री करून या समस्या सोडवल्या जाईल. जनता दरबारात यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १२ शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी केले. तसेच लक्ष्मी मुक्ती योजना कशा प्रकारे यशस्वी होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली असून पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक रोशन कापसे यांनी दिव्यांगाकरीता घरपोच धान्य पोचविण्याची योजना आणण्याची माहिती दिली.

या जनता दरबाराला तहसीलदार धनंजय देशमुख लाखनी, सहाय्यक गटविकास अधिकारी नेताजी धारगावे लाखनी, अधिक्षक ए. यू. देव्हारे पं.स. लाखनी, अनमोल बोदले तालुका आरोग्य विभाग पं.स. लाखनी, तालुका कृषी अधिकारी लाखनी यांचे कार्यालयातील कर्मचारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी एम. जी. मेश्राम पं.स.लाखनी, पाटबंधारे उपविभाग साकोली येथील श्रीमती प्रियंका चिचाळकर तसेच तहसील कार्यालय लाखनी येथील नायब तहसीलदार धर्मेंद्र ऊरकुडकर तसेच रोशन कापसे पुरवठा निरीक्षक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता श्रावण कापगते व समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते. पत्रकार व जनप्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *