रेती वाहतूक करताना ट्रॅक्टरवर करडी पोलीसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डोंगरदेव रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या दरम्यान ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत व पोलीस गस्ती करीत असतांना अवैध रेतीची वाहतूक करताना बिना नंबरचा आयसर कंपनीचा टैक्टर एक ब्रास रेती घेवून जातांना आढळल्याने पोलीसांकडून विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारची रायल्टी आढळून आले नसल्याने करडी पोलीसांकडून कारवाई करुन चालक कामदेव चद्रभोज तिजारे वय २३ वर्ष व मालक मंगेश मुलचंद जगनाडे वय २७ वर्ष दोन्ही ढिवरवाडा यांच्या विरोधात करडी पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास प्रफुल्ल वालदे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *