१८ दिवसांपासून कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शासनाकडून नियमितीकरणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी १९ ऑगस्टपासून बेमुदत संप सुुरू केला आहे. यात जवळपास ६५० अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे. भंडारा जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला १८ दिवस लोटूनही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. परिणामतः आरोग्य सेवा कोलमडली आहे. आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, एसएनसीयू, डायलिसिस युनिट, लसीकरण, मातृत्व व बाल आरोग्य सेवा, औषधोपचार आणि सर्वसाधारण रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. सध्या पावसाळाचे साथीचे आजार वाढत असताना या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुकसुकाट दिसून येत आहे. संपकऱ्यांना शासनाच्या सकारात्मक निर्णयाची प्रतीक्षा आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक कर्मचारी २००५ पासून सेवा बजावत असून निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले तरी त्यांचे समायोजन झालेले नाही. शासनाने मागण्यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आरोग्यसेवेवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकात संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने दिला आहे. जिल्ह्यात डेंगू, मलेरिया आणि हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. या संकटाच्या काटात ग्रामीण आरोग्य यंत्रनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गाव खेड्यातील यंत्रणा पूर्णतः ठप्पपडली आहे. संपामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुकसुकाट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *