जुगार अड्डयावर धाड, पाच आरोपी ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- टाकळी पुनर्वसन येथील स्मशान भुमीजवळ येथे सुरु असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड घालून वरठी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७१ हजार २०० रुपयाचाम मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीकांत सोमनाथ रामटेके (वय ३५, रा. लावेश्व), गणेश धनराज बोरकर (वय ३२, रा. टाकळी पुन. ह. मु. आझाद वार्ड बोरी रोड तुमसर), योगेश शंकर पवनकर (वय ३५, रा. टाकळी/ पुन.), जर्येन्द्रथ गणेश देवगडे (वय ३४, रा. टाकळी/पुन.) व शुभम चंद्रशेखर गजभिये (वय २८र्, रा. भगतसिंग वार्ड नविन टाकळी) असे आरोपींचे नाव आहे. वरठी पोलीस स्टेशनचे हवालदार उईके यांनी पोलीस स्टॉफसह ही धाड घातली. आरोपींच्या ताब्यातून नगदी, मोबाईल, दोन मोटारसायकल, तासपत्ते मिळून एकूण ७१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. वरठी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मडावी, हवालदार उईके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *