भंडारा शहर खड्डेमुक्त करून कंत्राटदारावर कारवाई करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – भंडारा शहारातील रस्ते खड्डेमुक्त करून संबंधीत अधिकारी व कॉन्ट्रक्टर यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निजवेदन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर व भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मो. आबिद सिद्धीकी यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिले. निवेदनानुसार, भंडारा शहरातील रस्त्यांची हालत जास्त प्रमाणात खराब झाल्यामुळे दुचाकी वाहने चालविणे व पायी चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक दुचाकी वाहक हे अपघातग्रस्त झालेले आहेत. अनेक अपघातग्रस्त लोकांना लाखो रुपये खर्च करुनही ते बरे झालेले नाहीत.

ह्या संबंधीत अधिकाऱ्यांना वारंवार मौखिक तसेच लेखी निवेदन देवून व आंदोलन करुन सुद्धा संबंधीत अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि असे निष्क्रीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर कडून निम्न दर्जाचा काम सुरु असल्यामुळे रस्त्याची हालत खस्ता झालेली आहे. याकडे तातडीने लक्ष देवून संबंधीत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर उचित कार्यवाही करावी अशी मागणी विकास मदनकर व मो. आबिद सिद्धीकी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *