आज करडी येथे माजी आमदार बच्चू कडू यांची जाहिर सभा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा : – बच्चू कडू यांनी अमरावती मध्ये आमरण उपोषण केले असता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता करावी आणि दिव्यांगाना ६००० हजार रुपये मासिक अनुदान द्यावे तसेच शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज पुरवठा मिळावा याकरिता उद्या दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता भडके सभागृह करडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बचु कडु यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अस आवहान प्रहारचे मोहाडी तालुका अध्यक्ष चिंतामण तीबुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *