राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तुमसर नगरपरिषदसमोर जनसुनावणी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर : – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरपरिषद, तुमसर येथे आयोजित भव्य जनसुनावणी आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडले. या आंदोलनात महिला, वृद्ध, युवा अशा सर्वच वर्गातील नागरिकांच्या समस्या नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार व सांडपाणी व्यवस्थापन, कचरा संकलन, वीजपुरवठा तसेच आरोग्यसंबंधी अनेक प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांची नोंद घेऊन त्यांच्या निराकरणासाठी आश्वासक भूमिका मांडली. त्यामुळे नागरिकांनी जनसुनावणी आंदोलन यशस्वी ठरल्याचे समाधान व्यक्त केले. या आंदोलनाला साथ देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व माध्यम प्रतिनिधी यांचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. नागरिकांच्या हक्कासाठी व शहराच्या विकासासाठी मोठ्या संख्येने तुमसर शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *