सिहोरा पोलिसांची मोठी कारवाई; विविध ठिकाणच्या हातभट्टीवर धाडी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत विविध ठिकाणाच्या मोह फुल चालू भट्टीवर काल ३० ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या पोलीस पथकासह धाड टाकून ४ लाख ७१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार असून एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जयराम दयाराम खेळकर वय ५४ वर्ष रा. खेळकर टोली यांचे विरुद्ध अ. क्र.२२९, जयवंता माणिक खेळकर वय ५० वर्षे रा. खेळकर टोली यांचे विरुद्ध अ. क्र. २३० व प्रवीण रवींद्र खेळकर वय १९ वर्ष रा. खेळकर टोली यांचे विरुद्ध अ. क्र. २३१ हे तिन्ही आरोपी फरार असून विकास कन्हैया बनसोड वय २५ वर्षे रा.चुल्हाड यांचे विरुद्ध अ. क्र.२३२/२०२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीकडून सर्व मिळून ९२ प्लास्टिक झील्ह्या व ५० नग पाऊच असा एकूण ४ लाख ७१ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस शिपाई अतुल बावनकर, पोलीस शिपाई रवींद्र सव्वा लाखे, पोलीस शिपाई निखिल मेश्राम व पोलीस शिपाई लोकेशन डुंबरे यांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय कसोधन हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *