जिद्द चिकाटी मेहनत घेतली तर यश प्राप्त होतोच – आ. राजू कारेमोरे
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- स्पर्धेत टीकायचे असेल तर युवकांन्ही जिद्द चिकाटी, मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाहीं, असे स्पर्धेच्या उदघाट्न स्थानावरून आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी प्रतिपादन केले. मोहाडी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळच्या वतीने मॅरेथॉन भव्य रनिंग स्पर्धेचे आयोजन ३१ ऑगस्ट ला अकाळी ८ वाजता करण्यात आले होते, कार्यक्रम उदघाटक म्हणून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे होते तर सहउदघाटक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडेगाव सरपंच ईश्वर माटे होते.
पोलीस पाटील माटे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते नरेन भोयर, सुनील गराडे, महेश बुधे, आश्वले, श्रीधत बांते, पत्रकार रेहपाडे, अमोल भुते, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते, स्पर्धेत नागपूर, तिरोडा, भंडारा येथील युवकांही मोठ्या संख्येत भाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक गौरव खोडतकर नागपूर यांनी पटकविले तर द्वितीय रोहित पटले तिरोडा यांनी तर तृतीय पुरस्कार अजित उके सुरेवाडा यांनी प्राप्त केले, तर मुलीमधून वैशाली वंजारी डोंगरगाव यांना प्रोत्साहन पारितोषिक आ. राजूभाऊ कारेमोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.









