पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा भंडारा दौरा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गृह,(ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर हे २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मंत्री भोयर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व व मान्यवरांच्या भेटी दाखल होतील. यावेळी स्थानिक मान्यवर व पदाधि त्यानंतर ११.३० ते १.०० या वेळेत जिल्हा भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. दुपारी १.०० ते २.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक होईल. त्यानंतर २.३० ते ३.०० या वेळेत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासंदर्भात बँकर्ससोबत चर्चा होईल. ३.०० ते ३.३० या वेळेत पोलीस प्रशासनाची स्वतंत्र आढावा बैठक, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सर्व बैठकीनंतर ३.३० वाजता पालकमंत्री शासकीय वाहनाने भंडारा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.









