दारूबंदीसाठी तंटामुक्त समिती व ग्राम पंचायत चे निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- आपल्या ग्रामपंचायत हद्दीत दारू बंदीच्या निर्णय घेऊन खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी एक आदर्श निर्माण करून आपल्या ग्राम पंचायत तीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या ग्राम पंचायत व तंटामुक्ती समितीने सुद्धा आपल्या क्षेत्रात दारूबंदी करावी याकरिता नुकतेच ग्रामपंचायत खैरी वलमाझरीच्या वतीने आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना पत्रक दिले असून भविष्यात या निर्णयाच्या लाभ सर्व सामान्य ग्रामस्थांना नक्कीच मिळेल अशा या नावीन्यपूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्यातील खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. स्वच्छ सुंदर हरित गटग्रामपंचायतच्या वतीने येथील आदर्श सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या मार्गदर्शनात आजूबाजूच्या पिंडकेपार, घानोड तसेच खांबा येथील ग्रामपंचायतींनी सुद्धा आपल्या गावात दारूबंदी करावी अशा आशयाचे निवेदनरूपी पत्र देवून एका नव्या आणि अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाची पहिल्याच तंटामुक्त समितीच्या सभेत सुरूवात केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले की खैरी वलमाझरी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैरी, वलमाझरी, आमगाव खुर्द व पिटेझरी चारही गावात दारूबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये व्यसनांचे प्रमाण कमी झाले व त्यामुळे होणारे कौटुंबिक कलह तसेच गावातील वाद कमी झाले आहेत. लोकांची मानसिक तथा आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. परंतु अजूनही काही व्यक्ती जवळच्या गावात जावून व्यसने करून येतात त्यामुळे काही वादाचे प्रसंग उद्भवतात. हा प्रकार बंद व्हावा व गाव परिसरात शांती नांदावी यासाठी आजूबाजूच्या पिंडकेपार, घानोड व खांबा येथील ग्रामपंचायती व तंटामुक्त समितींनी या उपक्रमाला सहकार्य करावे व संबंधित गावसदर पत्राची प्रत या पिंडकेपार, घानोड व खांबा येथील ग्रामपंचायत व तं. मु. समितीला विनंती म्हणून सहकार्याच्या अपेक्षेने देण्यात आली आहे. शिवाय पत्राची प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक पो. स्टे. साकोली, तहसिलदार साकोली व गटविकास अधिकारी पं. स. साकोली यांना देखील माहितीस्तव व योग्य कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे. या निर्णयाप्रसंगी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, तं. मु. स. अध्यक्ष तेजराम भलावी, ज्ञानेश्वर रामटेके, पो. पा. शंकर कापगते, अजय घरडे, श्रीराम रूखमोडे, वामनराव कापगते, प्रेमराज लंजे, भीमराव गहाणे, निंबराव सयाम, सुखचंद वैद्य, राजकुमार घरडे, प्रभुदास केवट, दिलीप नारनवरे, कृष्णा घरडे, धनराज तिरपुडे, ओमप्रकाश बाळबुद्धे, सुरेश कापगते, श्रावण मेश्राम, भोजराम लांजेवार, राकेश टेकाम, गजानन मरसकोल्हे, एकनाथ पंधरे, दुर्योधन नारनवरे, सुरेश मेश्राम आदी तंटा मुक्त समिती सदस्य व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.









