नागपूर – गोंदिया प्रवास होणार आता अधिक जलद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गास आणि त्यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी दि.२६ ऑगस्ट ला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्रुतगती महामार्ग नागपूरपासून गोंदिया पर्यंत उभारण्यात यावा यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानुरूप राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवी झेंडी मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचे खासदार प्रफुल पटेल यांनी आभार मानले.

नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहचण्यासाठी साधारणपणे ४ तास लागतात. मात्र आता नवीन द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर कमी होऊन प्रवासाचा कालावधी दीडते दोन तासावर येणार आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १० तालुके, ११५ गावातून जात आहे. यात २६ उड्डाणपूल, प्राण्यांसाठी ८अंडरपास, १५ मोठे व ६३ लहान पूल, ७१ कालवा क्रॉसिंग आदिंचा समावेश आहे. तसेच गवसी, पाचगाव, ठाना,रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहरी व सावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाने याला मंजुरी दिली होती. आता भूसंपादनाला गती येणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हावासीयांना या नवीन मार्गाची मोठी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *