बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी येथे राहणारा इसम सोमवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार मृतकाच्या कुटुंबीयांनी एकोडी येथील पोलीस चौकीत दिली होती. मंगळवारी इसमाचा मृतदेह गडकुंभली रोडवर आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह आढळल्याची बातमी पोलीस स्टेशनला येताच पोलिसांनी अगोदर चौकशी केली. परंतु त्यावेळेस मृतदेह अनोळखी होते. मग नंतर सखोल चौकशी केल्यानंतर कालपासून बेपत्ता असलेल्या एकोडी येथील सुनील बडोले या इसमाचा असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. गडकुंभली रोडवरील वस्तीगृहाच्या बाजूला आढळून आला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली .
सुनील प्रकाश बडोले वय ५० एकोडी/किन्ही असे मृतकाचे नाव असून सोमवारी (दि.२५) सुनील हा नेहमीप्रमाणे घरून निघून गेला व घरी सांगितले की मी आज उशिरा येईल. परंतु सुनील घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी याची माहिती एकोडी येथील पोलीस चौकीत दिली होती. अधिक माहिती अशी की वस्तीगृहाजवळ मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी दि. २६ रोजी काही नागरिक फिरायला गेले असता अज्ञात व्यक्तीच्या मृतदेह दिसून आला. तेव्हा स्थानिक लोकांनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. यानंतर तत्काळ सदरील घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सुनीलला दारू पिण्याच्या छंद होता. त्यामुळे अति मध्य सेवनामुळे मृत्यू मध्यामुळे सुनील चा मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाज असल्याची माहिती साकोली पोलिसांनी दिली.याप्रकरणी साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस हवालदार खुळसुंगे तपास करीत आहेत.









