
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासनमान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्यांच्या पुर्ततेसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने आज दि. २१ एप्रिल रोजी प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनानंतर तोडगा न निघाल्याने पटवारी व मंडळ अधिकारी संघटनेच्यावतीने उद्या दि. २२ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे यासंदर्भात संघटनेतर्फे एक महिन्याअगोदर भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. आज जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर पटवारी व मंडळ अधिकारी यांनी आंदोलन केले. त्यानंतर स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरीकांना त्रास होणार आहे.