उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- महावितरण उपविभाग मोहाडी अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले. तसेच ऑनलाईन विज बिल भरणाऱ्या ग्राहकातुन लकी ड्रॉ द्वारे तिन ग्राहकांना पुरष्कार वाटप करण्यात आले. गुणगौरव कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता गिरी भंडारा, कार्यकारी अभियंता जैस्वाल भंडारा, उपव्यवस्थापक आगाशे, उपव्यवस्थापक सार्वे भंडारा, उपकार्यकारी अभियंता सुनील मोहुर्ले मोहाडी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वीज देयकाचे ऑनलाईन बिल भरण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या लकी ग्राहक योजनेअंतर्गत ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रथम क्रमांक गिताबाई जगनिक यांना मोबाईल, द्वितीय क्रमांक आलेले हसन अहमद शेख यांना मोबाईल व तृतीय क्रमांक आलेले पुंडलिक तरारे यांना स्मार्ट वॉच पुरस्कार म्हणून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *