विलास खोब्रागडे यांना गुणवंत अधिकारी /कर्मचारी पुरस्कार जाहीर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे वेळोवेळी राज्यशासनाचे उपक्रम राबवताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य पणाला लागते. राज्य व केंद्र शासनाचे विविध योजना व प्रकल्प राबविण्याकरिता त्यांनी प्रशासकीय अनुभव पणाला लावून प्रयत्न केले. राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड अंतर्गत कार्बन नुट्रल विशेष पंचायत पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम पुरस्कार, नमो आत्म निर्भर भारत, पंचायत लर्निंग सेंटर, वन व्यवस्थापन, अशा अनेक योजना त्यांनी राबविल्या. अशातच अधिकाऱ्यांचे विशेष कौशल्य व गुणवत्ता ओळखून आशा अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी सन्मानित केल्या जाते. २०२२-२३ या वर्षाकारिता उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून ग्रामपंचायत बेला चे ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.
या पुरस्काराकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, मिलिंदकुमार साळवे (भा. प्र. से.), अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उमेश नंदागवळी, गट विकास अधिकारी, डॉ. संघमित्रा कोल्हे, सरपंच, शारदा गायधने (शेंडे), विस्तार अधिकारी, प्रमोद हुमणे, प्रमोद तिडके, विवेक भगत, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विलास खोब्रागडे यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.