दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- साफ सफाईच्या कामावर कुणालाही न सांगता विना परवानगी ने गैरहजर राहून तीन कर्मचारी कामचुकारपना करीत असल्याचे दिसून आल्याने तुमसर चे न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी तत्काळ प्रभावाने त्या कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. यामुळे नगर पालिकेचे सफाई कामगार पूर्णतः हादरले आहेत. सफाई कामगारांना असे निलंबीत केल्याची ही पहिलीच घटना आहे, हे विशेष. मुकेश राणे, अनिता मोगरे, सुनंदा भोंडे तुमसर न. प. चे सफाई कामगार असे निलंबीत करण्यात आलेल्या कामगारांचे नावे आहेत. नगर परिषद तुमसर क्षेत्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी ही शहर सफाई विभागाची आहे. परिणामी क्षेत्राची स्वच्छता करण्यासाठी सफाई विभागामध्ये कार्यरत सफाई कर्मचारी यांना प्रभाग निहाय स्वच्छता विषयक कामाची जबाबदारी कार्यालयाकडून सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे नियमितपणे शहरामध्ये साफसफाई विषयक कामे दैनंदिनरित्या पूर्ण होणे अपेक्षित असताना आज दि. १७ एप्रिल ०२४ ला सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास प्रभागात मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सफाई कामावर अचानक भेट दिली असता तीन सफाई कामगार आपले प्रभागातील कर्त्यव्यावर विनापरवानगी ने गैरहजर असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
यावरून असे दिसून येत की, सदर सफाई कामगार आपले दैनंदिन कर्त्यव्यपार पाडीत नाही. व प्रभागातील साफ-सफाईचे कामे करीत नसल्यामुळे त्या प्रभागात अस्वच्छता राहत असल्याने अस्वच्छता विषयक नागरिकांचे तक्रारीस वाव मिळत आहे. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या बरोबर नसून शिस्तीचे अगदी विरुद्ध आहे. सफाई कामगारांनी कार्यालयाची परवानगी न घेता अथवा कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता विना परवानगी कर्त्यव्यावरगैरहजर राहणे, प्रभागातील सोपविण्यात आलेली कामे बरोबर पार पाडीत नाहीत. त्यामुळे स्वच्छता विषयक नियोजन करण्यास कार्यालयास अडचणी उद्भवत आहेत. परिणामी सदर सफाई कामगारांना नगरपालिकेची नोकरीची गरज नाही. करिता महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे विहीत तरतुदी अंतर्गत व प्राप्त अधिकारा अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ मधील (सहा) चे तरतुदीनूसार गैरवर्तणूकी बाबत नियमान्वये आपली विभागीय चौकशी होईपर्यंत ३ सफाई कामगारांना सेवामधून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. परिणामी तुमसर नगर पालिकेच्या सफाई कामगारांना एकच धडकी भरली आहे.