
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा शासनामार्फत दि. १५ एप्रिल ०२५ रोजी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भंडारा जिल्हयातील दोन उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भंडारा जिल्हयातील सुशिकला आगासे, (खेळाडू) यांना सायकलींग या खेळामध्ये त्यांच्या उत्कृष्ठ कामगीरीकरीता सन २०२२-२३ या वर्षाचा शिवछत्रपती राज्यब क्रीडा हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच ज्योती गडेरीया, (पॅरा सायकलीस्ट) यांना त्यांच्या या उत्कृष्ट कामगीरीकरीता सन २०२३-२४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्यब क्रीडा हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सदर खेळाडूंना शिवछत्रपती राज्यब क्रीडा पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांनी पुरस्कारार्थांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.