
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- शिवाजी चौक मोहाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त सात दिवसीय भागवत सप्ताहात दानात दान श्रेष्ठ दान रक्तदान हे संकल्पना ठेवून लायन्स क्लब गोल्डन तुमसर, सार्वजनिक हनुमान जन्मोत्सव समिती व शारदा महिला भजन मंडळ यांच्यातर्फे ११ एप्रील रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात १२ दानदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे सुनील पारधी, दीपक रावलानी, तरुण सोनी, विजय गायधने, पवन चव्हाण, प्रल्हाद बावनकर, सूर्यकिरण पटले, कविता पारधी, सरिता गायधने तसेच हनुमान जन्मोत्सव समितीचे भीमराव बारई, गोपाल मोटघरे, गणेश बारई, श्याम , सुरेश वडतकर, आकाश गायधने, किशोर पात्रे, रविकांत देशमुख, रोशन, भावेश बारई, मानस बारई, सागर मोटघरे, शारदा महिला भजन मंडळाचे सुषमा वडतकर, जोत्सना पात्रे, सुनीता कळंबे, रीता भाजीपाले, कल्पना वाघमारे, रेखा चिंधालोरे, गंगा गिरीपुंजे इत्यादींनी सहकार्य केले.