पालोरा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- हनुमान मंदिर पालोरा येथे देवस्थान कमिटी व संयुक्त ग्रामवासीच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा देवस्थान हनुमान मंदिर येथे शुक्रवार ला सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि आज दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी गावातुन शोभायात्रा काढून मंदीरात समाप्ती केली. तसेच दुपारी १ वाजता गावातील जेवढं भजन मंडळ आहेत त्या मंडळाकडून भजनाचे आयोजन करण्यात आले होते आणि ५ वाजेपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून पालोरा परीसरातील नागरीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान जयंती साजरी करण्यासाठी देवस्थान कमिटी कडून आयोजन करण्यात आले होते व समस्त ग्रामवासियांनी सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थान कमेटीचे सचिव विश्वनाथ हाडगे, अध्यक्ष शिवराम तुमसरे, योगेश्वर नखाते, विलास तिजारे, विजय हाडगे, रमेश लांडगे, मोनिष समरीत, उमेश तुमसरे, अमरकंठ शेंडे, दादु बुरडे, संतोष तुमसरे, रामेश्वर तिजारे, रविंद्र ठवकर अजय मुरकुटे, प्रणय काळे, तेजस कुकडे, वृक्षभ काळे, राजु बावनकर, कैलास बांते, मोहन अतकारी, पुरूषोत्तम बावनकर, सतीश ठवकर, दिपक जावळकर, प्रमोद रोटके, भय्या कनोजकर, विजय जावळकर, अमरकंठ धांडे, विनोद तिजारे, आशिष तिजारे, संजय अतकारी, विनोद धार्मिक, गणेश हलमारे, विनोद कुकडे, गोविंदा बांते, बळीराम अतकारी, हितेश बुरडे, सुरदास खराबे व अन्य युवक व महीलांनी सहकार्य केले असून पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *