गोसे खुर्द धरणग्रस्तांनाच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणार – खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवा मरणाचा प्रश्न म्हणजे गोसे धरणग्रस्तांची असलेली समस्या. आज १३ एप्रिल २०२५ ला आंभोरा देवस्थान येथे गोसे धरणग्रस्ताची बैठक घेण्यात आली. सरकार येथे सरकार जाते, परंतु गोसेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. निवडणुका आल्या की मोठ-मोठे आश्वासन देणे आणि सरकार आली की समस्या कडे पाठ फिरविणे. गोसेबाधित कुटुंब,( प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त) यांना योग्य मोबदला दिला गेला नाही. पुनर्वसन विभागाकडून जमीन अधिग्रहण मधे अनियमितता दिसून येत आहे. शेतकऱ्यांना शेतजमिनीचा लाभ परिपूर्ण गोसे विभागाकडून दिला गेला नाही. गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत.

पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. नेरला, सूरबोडी या गावचे अधिग्रहण करण्यात आले नाही. ३६ वर्षाचा पदिर्घ काळ लोटून गेला मात्र धरणाचे काम पूर्ण झाले परंतु लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले नाही, आजही मोठ्या प्रमाणात आरडा ओरड सुरू आहे. धरणग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही, न्याय मिळू शकला नाही ही मोठी शोकांतिका आहे. या भाजप केंद्र आणि राज्य सरकारच्या दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे परत नविन समस्या निर्माण झाल्या आहेत.

गोसेच्या समस्या तात्काळ सोडवाव्या. अन्यथा मोठे जनआंदोलन करू असेही यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज झालेल्या आंभोरा येथील बैठकित सांगितले. यावेळी डॉ. प्रशांत पडोळे खा.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र, अभिजितजी वंजारी आ.पदविधर मतदार संघ, द्वीजेंद्रजी शर्मा सेवानिवृत्त न्यायधिस, रामजी बांते, भाऊ कातोरे, भागवतजी दिघोरे, कृष्णाजी घोडेस्वार, शिवशंकरजी माटे, प्रमिलाताई शहारे, आकाशजी भोयर तसेच गोसेखुर्द परिसरातील नागरिक, शेतकरी,शेतमजूर, मच्छीमार बांधव यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *