वैशिष्टयेपूर्ण योजनेतील रस्ता बांधकामात गैरप्रकार

 दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- पवनी शहरात प्रभाग १ मधील विठ्ठलगुजरी वॉर्डात सुरू असलेल्या वैशिष्टपूर्ण योजनेतून सिमेंट रस्ता बांधकाम करतांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने बांधकामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून चौकशीची मागणी होत आहे. नगर परिषद पवनी अंतर्गत शहरात अनेक विकासकामे होत असून बांधकामात अनियमितता असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी शासनाकडून अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. यातून रस्ते, नाल्या, अनेक ठिकाणचे सौन्दर्यीकरण यासह अनेक विकसनशील कामे केली जातात.

पवनी येथे प्रभाग क्र. १ मधील विठ्ठलगुजरी वॉर्डातील सुधीर बोरीकर यांचे घरापासून नागठाणा पर्यंत नाल्याच्या कडेला होत असलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम कंत्राटदाराकडून थातुरमातुर केल्या जात आहे. सदर रस्ता शासनाच्या वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान(ठोकतरतूद) योजने अंतर्गत होत असून अंदाजपत्रकीय किंमत ४९,९५,२५० रुपये एवढी आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने प्रचंड भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी जनतेनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *