अखेर शिक्षण विभागाने वादग्रस्त फादर अग्नल शाळेची मान्यता थांबविली

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- जिल्ह्याचा शिक्षण विभागाने दिलेल्या शाळा मान्यता पत्रानुसार दि. ५ एप्रिल ०२२ रोजीच्या संबंधित शाळेच्या अर्जाच्या संदर्भात फादर अग्नल शाळेशी केलेला पत्रव्यवहार व शाळेची केलेली तपासणी या आधारे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हापरिषद भंडारा यांच्याकडून दि. १ मे ०२२ पासून दि. ३० एप्रिल ०२५ पर्यंत तीन वर्षाच्या कालावधीसाठी इयत्ता १ ते ८ करीता विद्यासागर मंडळच्या फादर अग्नल स्कुल तुडका (तुमसर) ता तुमसर जिल्हा भंडारा या शाळेस तात्पुरती मान्यता देण्यात आली होती. परंतु, फादर अग्नल शाळेने बेकायदेशीर सात विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र देऊन शाळेतून बाहेर काढल्यामुळे व बालकांचा मोफत व सक्तीचाशिक्षणाचा अधिनियम २००९ नियमांचा उल्लंघन केल्यामुळे शिक्षण विभागाकडून कलम १८ च्या प्रयोजनार्थ बालांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाना हक्क नियम २०११ यांच्या नियम ११ पोट नियम ४ अन्वये शाळांना मान्यता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हापरिषद भंडारा यांनी आरटीई मान्यता थांबविल्याने खळबळ माजली आहे.

याप्रकरणात फादर अग्नल शाळेकडे पुढच्या शैक्षणिक सत्राकरिता आरटीई मान्यता नसल्याने कोणत्याही पालकांनी या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीत प्रवेश करू नये असे आवाहन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सदर वादग्रस्त व मुजोर शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी अन्यायग्रस्त पालकांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला गोतारणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख तथास्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच. मेश्राम, पालक संघाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. आशिष कुकडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गभने यासहअन्याग्रस्त पालक योगेश रंगवानी, विजय लालवानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *