विलास केजरकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती महाराष्ट्र च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विलास रामचंद्र केजरकर यांची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी सर्वसंमतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. केजरकर हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून कार्यरत आहेत. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिकचे उद्योजक तथा अध्यक्ष राजेंद्रशेठ आहेर, कार्याध्यक्ष राजेंद्रशेठ उंबरकर, संयोजक एकनाथ बोरसे यांनी आरक्षण समितीच्या माध्यमातून सर्वोर्थाने मागास धोबी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. विलास केजरकर यांची नाशिक उद्योजक तथा अध्यक्ष राजेंद्रशेठ आहेर, कार्याध्यक्ष राजेंद्रशेठ उंबरकर, संयोजक एकनाथ बोरसे यांनी निवड केली आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय सनद वाढई यांना दिले आहे. विलास केजरकर यांच्या नियुक्ती बद्दल डॉ. यशवंत लांजेवार, कार्तिक डोरले, राहुल मेश्राम, समीर नवाज, अविल बोरकर, प्रदिप काटेखाये, यशवंत बिरे, सुरेश घोडे, जयव चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *