घरकुल योजनेच्या रेती वाटपाला सुरुवात

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभाग द्वारे विविध आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निःशुल्क पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णया नंतर पवनी आणि भंडाराच्या १० डेपोंचे उद्घाटन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय आहे की भंडारा जिल्ह्यातील रेती घाटावरून शासकीय घरकुल योजनेच्या लभार्थीला रेती मिळणे अवघड जात होते. या विषयाला गांभीर्याने घेत शासनाच्या मसुल विभागाने एक निर्णय पारित केला, ज्यात १ जून ते ९ जून च्या दरम्यान आवास योजनेच्या लभार्थीला पाच ब्रास रेती निशुल्क देण्यात येईल.

या करीत भंडारा तेलुक्यातील ६२ गावातील ६३२४ लभार्थीला वडेगाव/ बेलगाव आणि मौज कोथूर्णा या दोन घटवरून तसेच पवनी तालुक्यातील ४१ गवंची १६३७ घरकुलांकरिता जूनोना, वलणी, विलम, कुर्जा, रुयाळ धानोरा, कोरंभी आणि मांगली या आठ घाटानवरून रेती देण्यात येणार आहे. या घटवरून १ जून पासून रेती वितरण सुरू करण्यात आले. ज्याचे उद्घाटन आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, भंडारापवनी चे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, भंडारा तहसीलदार संदीप माकोडे, पवनी तहसीलदार महेंद्र सोनवणे व महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *