दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगर पंचायत असलेल्या भरवस्तीत राहणाऱ्या पशुपालक केतन कोमल गिर्हेपुंजे रा.लाखनी, जिल्हा भंडारा यांच्या घराजवळील असलेल्या मालकीच्या गोठ्यातील बकऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने शिकार करून एक बकरी फस्त केल्याची घटना (ता.१०) रोज गुरुवारला सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अर्धापेक्षा जास्त फस्त केली. या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे वन-जंगल क्षेत्र कमी होऊन सिंमेट जंगल क्षेत्र वाढलेले आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आणी मानवी संघर्ष वाढले असुन मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचे वावर वाढला आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या आणि मानवाच्या अस्तीत्वाला धोका निर्माण झाला आहे. लाखनी शहराचा विस्तार होऊन अनेक नविन वसाहती निर्माण झाल्याने हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असताना गावात लांडगे, कोल्हे आणि बिबटे येऊन पाळीव प्राण्यांची वण्य प्राणी गावात येऊन शिकार केल्याची या महिन्याची लाखनी बिटतील ७ वी घटना असून दिवसोनेदीवस वाढत आहे.
पशुपालक केतन गिर्हेपुंजे यांनी घराला लागुन असलेल्या गोठ्यामध्ये बकरी बांधली होती. मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्यानी शिरकाव करून बकरीला फाडून खाल्याचे सकाळी दिसल्याने या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले लाखनी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले लाखनी, बिटरक्षक टी. जी. गायधने लाखनी तसेच बिट मदतनीस मयूर गायधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी लता देशमुख यांनी शवविच्छेदन करून १३ महिने बकरीची किंमत १० हजार रुपयांची नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला. मृत बकरीला खड्डा खोदून जमिनीत पुरण्यात आले. घटनास्थळी असलेल्या पगमार्क वरून वन्यप्राणी लांडगा असल्याचे समजले पशुपालक केतन गिर्हेपुंजे यांचे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान भरपाई वन विभागाने द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी यांनी केली.