डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी कार्यवाहीत घोळ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या आणि मुळातच भ्रष्टाचाराचे संरकार असलेल्या नेमा कुटुंबियांनी जिल्हयातील नामांकित डॉक्टरांच्या मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून करोडो रू. चा चुना लावल्याप्रकरणी पोलीस विभागात तक्रार दाखल करूनही आरोपींना अटकेपासून पुरेसा वेळ दिल्यामुळे आणि कार्यवाहीत स्पष्टता नसल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या निवेदनातून करत आहे. प्रकरण असे की, सतीश नेमा, मनिष नेमा ह्या दोन्ही भावडांनी अंजेनिय गाईडंस पॉईंट या नावाखाली मागील दोनतीन वर्षापासून शास्त्रीनगर कॉम्प्लेक्स येथे ऑफीस उघडून त्यातून नीट परीक्षेत कमी मार्क्स, नापास झालेल्या सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स, चीन, युक्रेन सारख्या देशामधील मेडीकल कॉलेज मध्ये किंवा त्यापुढे एम. डी. किंवा विशिष्ट शाखेत डिप्लोमा घेण्यासाठी ऍडमिशन मिळवून देतो, तुमचा मुलगा डॉक्टर होईल अशा प्रकारचे स्वप्न दाखवून पालकांकडून लाखो रूपये उकळायचे.

या कामामध्ये ह्या दोन्ही भावंडांचे वडील वसंत नेमा जि. प. भंडारा येथे उपमुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांचीही मदत घेत होते. वसंत नेमा ह्यांचीही शासकीय सेवेत असतांना कारकीर्द अतिशय वादग्रस्त होती. अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये त्यांचा थेट संबंध होता. त्यांचेच अनुकरण करीत दोन्ही मुलांनी डॉ. विलास कावरे, डॉ. फुले, डॉ. बाळबुध्दे सारख्या पालकांकडून त्यांच्या मुलांना विदेशामध्ये एम.बी.बी.एस, एम.डी., डिप्लोमा करिता कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याकरीता जवळपास ९० लाख रू. घेतले.अशाप्रकारे मागील दोन-चार वर्षात अनेकांना गंडा घालून त्यातून करोडो रूपयाची माया जमवून त्यातून भंडारा शहरात राहत्या आलिशान घराव्यतिरीक्त दोन फ्लॅट, त्याचप्रमाणे नागपूर, पुणे सारख्या ठिकाणी सुध्दा दोनदोन फ्लॅट खरेदी करून ठेवलेले आहेत. प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नसुन असे अनेक पालक आहेत की, ज्यांनी हया भामट्यांना पैसे दिले, त्यांच्या पाल्यांना ॲडमिशन मिळालीच नाही. परंतु समाजामध्ये आपली बदनामी होवू नये याकरीता स्वतः समोर येत नसून यापुर्वी हया नटवरवलाल भावंडांनी ॲडमिशन च्या नावाखाली पाठविलेले अनेक विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्र विदेशामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी घरी बसलेले आहेत. त्त्यांचे वर्ष वाया चाललेले आहेत.

या प्रकरणाची तक्रार डॉ. कावरे, डॉ. फुले, डॉ. बाळबुध्दे हयांनी पोलीस विभागात तक्रार केल्यानंतर पोलीस विभागातर्फे दोन्ही भावंडांवर गुन्हे नोंदविले खरे. परंतु ज्यांच्या खात्यात हे पैसे वळते केले, ज्यांच्या खात्यातून व्यवहार झाले त्या वसंत नेमावर मात्र कुठलाही गुन्हा नोंदविला नसून, ते या कार्यवाही तून मोकळे कसे? भावंडावर गुन्हा नोंदविल्यानंतर अटक करण्याकरीता पोलीस विभागाने फारसे गांभीर्य न दाखविल्यामुळे आरोपी न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळिवण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या सर्व प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतांना दिसत असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर ह्या प्रकरणात गुंतलेले अनेक अशा नटवरलालांची नावे समोर येतील आणि फसवणूक झालेल्या पालकांना न्याय देण्याची व वसंत नेमा यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदविण्याची मागणी या निवेदनातून करण्यात येत असून असे न झाल्यास शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात असेल याची नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तिलक सार्व्हे, राकेश आग्रे, मयूर जोशी, निलेश चामट, राजेश ठवकर, नितीन भुरे, विष्णू ठवकर, अविनाश मते, जितू हटवार, नंदकिशोर बावणे, मुकेश तिजारे, कुंदन चौधरी, विनोद आस्वले इ. पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *