मोहाडी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी तालुक्यातील मौजा मोहगाव देवी, बोथली घाटकुरोडा, देव्हाडा खुर्द, निलज बू., ढिवरवाडा या रेती घाटावरून पाच ब्रास मोफत रेतीचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी दिली. ३१ मे ते ९ जून या कालावधीत सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रेती वाटप करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या दि. ८ एप्रिल व ३० एप्रिल वाळू निर्गती धोरणानुसार व जिल्हाधिकारी भंडारा यांच्या २९ मे च्या आदेशानुसार मंजूर व लिलावात नसलेल्या वाळू गटामधून हे वाटप करण्यात येणार आहे पर्यावरण मंजूर प्रती घाटाचा उपयोग करून स्थानिक पातळीवरील घरकुल योजनांना ही सुविधा दिली जात आहे. सदर घाटामधून मिळणारी रेती ही घरकुल लाभधारकांना मोफत देण्यात येणार आहे. तरी त्यांनी रेती वाहतूक व उत्खनन करण्याची व्यवस्था करावी. रेती घाटामधून रेती घेऊन जाण्यासाठी येताना लाभधारकांनी आधार कार्ड व स्वतःचा मोबाईल नंबर सोबत घेऊन यावा. सदर योजनेचा मोहाडी तालुक्यातीलसर्व घरकुल लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान तहसीलदार मोहाडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *