गादिया-बरौनी प्रवाशांकडून १० लाखांचे दागिने जप्त एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांकडून १० लाखांचे दागिने जप्त
अशाच प्रकारे एका आठवड्यापूवर्ी गुरुवार ०३ एप्रिल रोजी विभागीय कार्यकर्ता पथकाचे प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंग, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद कुमार, जी. आर मांडवी, ए.आर. रायवार आणि गुन्हे गुप्तचर शाखा, गोंदिया यांच्या संयुक्त चौकशीत काळ्या-निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये एक व्यक्ती फलाट क्र.३ गोंदिया रेल्वेस्थानका तील स्थानक व्यवस्थापक कार्यालया समोर सायंकाळी ६ वाजता हातात बॅग धरून संशयास्पद स्थितीत फिरत असताना पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. पुढे चौकशीत त्याने आपले नाव राकेश गोकुळदास आहुजा (५१, रा. गोंदिया, श्रीनगर, मालवीय वॉर्ड रामचंद्र ऑईल मिल जवळ असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीत ९ लाख १० हजार रुपये सापडले होते. सदर रोख रक्कम ट्रेन मधून नेण्यासाठी वैध अधिकार आणि कागदपत्रे मागितली असता, त्याच्याकडे व्यवहाराचे कोणतेही वैध कागदपत्र नव्हती. रेल्वेतून रोख रक्कमेची अवैध वाहतूक झाल्याची बाब आयकर विभाग, नागपूरला कळवण्यात आली होती. या जप्त केलेल्या रकमेची ही चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येत आहे.