
चंद्रपुरः- कुठलाही राजकीय नेता हा काय अमर पट्टा घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळं हे तर निश्चित होतं की शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारांमध्ये कुठेही साम्यता नाही. त्याप्रमाणे रेल्वेच्या दोन पटरी कधीही एकत्र येत नाही आणि आल्या तर अपघात झाल्या शिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे दोन वैचारिक प्रवाह एकत्र येण्यासारखं यांच्यात काहीही नाही. एक हिंदुत्वासाठी लढणारा पक्ष तर दुसरा सादारणतः हिंदुत्वावर कायम टीका करत आलेला पक्ष आहे. त्यामुळे केवळ सत्तेसाठी हे दोन वेगळे पक्ष एकत्र आले होते. आपल्याला आठवत असेल २४ ऑक्टोंबर २०१९ चा अशुभ वेळ, वेळी मनात इच्छा झाली. कधीकधी तात्कालीक फायद्यासाठी दूर जाणे हे त्रासदायक ठरत असते. अशी प्रतिक्रिया देत माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात आपल्या गैरहजेरीवर ही भाष्य केलं आहे. या गैरहजेरी बाबत माझा मुख्यमंत्र्यांशी सकाळीच चर्चा झाली. मुख्यमंत्री जात असतानाच मी त्यांना याबाबत कल्पना दिली. काल मला निमंत्रण आलं तसेच दुर्गेवार यांचा कॉलही आला. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईतअसल्याने आज या कार्यक्रमाला इन शक्य होणार नाही. किंबहुना माझ्या शिफ्टिंग चा १० जानेवारी रोजी शेवटचा दिवस असल्याने माझी गैरहजेरी असणार याची कल्पना दिली असल्याची स्पष्टोक्ती ही मुनगंटीवार यांनी दिली आहे.