
दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- साकोली तालुका विधिसेवा समिती व तालुका अधिवक्ता संघाच्या वतीने आयोजित लोक अदालतीमध्ये एकूण ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी आपसी तडजोडीतून तब्बल ८ लाख ४८ हजार ९८१ रुपये वसूल करण्यात आले. साकोली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा पॅनल प्रमुख व्ही. एम. गायकवाड याच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत झाली. यात दिवाणी व फौजदारी, अशी एकूण ५७३ प्रकरणे दाखल केले होते. बँक, नगरपरिषद, ग्रामपंचायत, वितरण कंपनीचे आपसी तडजोडीतून प्रकरण ठेवले होते. याप्रसंगी पॅनल सदस्य अधिवक्ता बघेले उपस्थित होते. साकोली न्यायालयाच्या सभागृहात झालेल्या लोक अदालतीमध्ये न्यायालयीन उपअधिक्षक, न्यायालयीन सर्व कर्मचारी, पी. एल. व्ही, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.