निमा असोसिएशन तर्फे मोहाडी येथे रक्तदान करून अनोखी श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय मिश्र वैद्यकिय संघटना जिल्हा भंडारा (निमा), राष्ट्रीय एकात्मिक कलाकार कार्यकर्ता मंच (निफा) तसेच तालुका वैद्यकीय संघटना मोहाडी तथा विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त सौजन्याने २३ मार्च रोज रविवारला शहीदे आजम भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून शहिदांना आदरांजली देण्यात आली. या शिबीरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबर “निमा’ असोशियन चे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते व निमाचे अध्यक्ष डॉ. राजेश चंदवानी यांच्या अध्यक्षते खाली तसेच निमा असोसिएशन चे तालुका अध्यक्ष डॉ. प्रशांत थोटे, सचिव डॉ. उल्हास बुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.

रक्तदान शिबिरा मध्ये तब्बल ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी परिचारिका सीमा तिजारे, व अश्विन नेवारे, यांनी दमदार कामगिरी बजावली. रक्तदान शिबिराला डॉ. योगेश गिरीपुंजे, डॉ. शरद गोमासे, डॉ. चेतन भागवतकर, डॉ. सुमित मदनकर, डॉ. अनिकेत सपाटे, डॉ. भूषण फेंडर, डॉ. प्रवीण फेंडर, डॉ. श्रीकांत मोहतुरे, डॉ. अविनाश खुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे तालुकाध्यक्ष हितेश साठवणे, विलास वाडीभस्मे, पलाश पाटील, पराग आगाशे, रेवती निमजे, शुभम माहुरकर यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व टिशर्ट वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *