३१ मार्च म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची डेडलाइन-चरण वाघमारे
ह्याव्यतिरिक्त जे धान शेतकऱ्यांनी मेहनतीने सर्व संकटाचा सामना केल्यावर उरले ते उत्पादन शासकीय धान खरेदी केंद्रात विक्रीसाठी देऊन जानेवारी २०२५ उलटून गेला आल्यावरही जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी आजही हक्काचा धान विक्रीची रक्कम मिळविण्यासाठी सरकारकडे भीक मागताना दिसून येत आहे. एकीकडे शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्हीच तुमचे मायबाप असल्याचे सांगावे. आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी विनाकारण विलंब लावावे. हे कुठले न्याय. हे कुठले शेतकरी पोषक सरकार म्हणता येईल. तुमच्या हातात सत्ता आणि राज्याच्या कारभाराची किल्ली जरी असली तरी शेतकरी, मजूर, यांच्या जीवावर उठून सरकारे चालीत नसतात हे राजकर्त्यानी समजले पाहिजे. ३१ मार्च नियमित कर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने वेळेवर कर्ज न भरल्याने बँकेची पत जाऊन दुबार कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा सिबील खराब होईल याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. जे बोनस द्यायचे, जे धानाचे चुकारे द्यायचे ते ३१ मार्च पूर्वी म्हणजे २५ मार्च अगोदर शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करावे.
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाला केली आहे. खरं तर ही मागणी सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधींनी करावयास हवी आहे. परंतु त्यांना जनतेच्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही घेतले असल्याने ते जरी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असले तरी मी मात्र जनतेशी असलेली नाळ, मला स्वस्थ बसू देत नाही. सरकारे सुद्धा जनकल्याणासाठीच आहेत. परंतु स्वार्थापोटी त्यांना पडलेली भूल लक्षात आणण्याचे कार्य करणे हेही तितकेच खरे असल्याचे यावेळी चरण वाघमारे यांनी सांगितले.